९. शब्दयोगी अव्यव
अधोरेखांकित केलेले शब्द अर्थात वर, कडे, पासून, खाली, हे विशिष्ट शब्दांना जोडून आलेले आहेत. अधोरेखांकित शब्द ज्या शब्दाला लागून आलेले आहेत. त्या शब्दाच्या दुसऱ्या शब्दाशी ते संबंध जोडताना दिसतात.
शब्दयोगी अव्ययाचे प्रकार :-
नाम व सर्वनाम यांचा वाक्यात उपयोग करतांना विभक्ती प्रत्ययाप्रमाणेच इतरही काही प्रत्यय असतात. हे प्रत्यय शब्दयोगी अव्यय म्हणून ओळखले जातात.उदा. खुर्चीवर, घराकडे, कधीपासून, टेबलखाली
अधोरेखांकित केलेले शब्द अर्थात वर, कडे, पासून, खाली, हे विशिष्ट शब्दांना जोडून आलेले आहेत. अधोरेखांकित शब्द ज्या शब्दाला लागून आलेले आहेत. त्या शब्दाच्या दुसऱ्या शब्दाशी ते संबंध जोडताना दिसतात.
शब्दयोगी अव्ययाचे प्रकार :-
१. कालवाचक :- आधी, नंतर, आता, पूर्वी, पुढे, पर्यंत,
२. गतिदर्शक :- पर्यंत, आतून, मधून, खालून, पासून,
३. स्थलवाचक :- मागे, पुढे, आत, बाहेर, जवळ, समोर, अलीकडे, ठायी, पाशी, नजीक, समीप, समक्ष
४. कारणवाचक :- व्दारा, मुले, करवी, करून, कडून, हाती, योगे,
५. हेतुवाचक :- करिता, कारणे, साठी, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त
६. तुलनात्मक :- मध्ये, तर, पेक्षा, परीस, तम
७. विरोधवाचक :- उलटे, वीण, उलट, विरुद्ध
No comments:
Post a Comment