Monday, 9 February 2015

१०. केवलप्रयोगी अव्यय

१०. केवलप्रयोगी अव्यय :- जे अविकारी शब्द मनातील आनंद, दुःख आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे :- 
१. संबोधनदर्शक :- ए, आग, आगो, अरे, अहो, रे,अंग,
२. हर्षदर्शक :- आहाहा, वा, वाहवा, अहा, आहो,आ, हा,
३. मौनदर्शक :- चूप, गुपचिप, गप, चिप 
४. शौकदर्शक :- अगाई, हाय, ऊं, अ, अरेरे, हाय हाय अयाई
५. विरोधदर्शक :- हट, इश्श, अंहं, छेछे, छे, छट,ऊहू
६. प्रशंसादर्शक :- भले, शाब्बस, पक्कड, खाशी, वाहवा, छान, ठीक,
७. आश्चर्यदर्शक :- आहोहो, अरेच्चा, अबब, बापरे,
८. समंतीदर्शक :- ठीक, हां, हा, अच्छा, जीहां,
९. तिरस्कारदर्शक:- हूड, छी, धिक, धु, इश्श, शीड

९. शब्दयोगी अव्यव

९. शब्दयोगी अव्यव
 नाम व सर्वनाम यांचा वाक्यात उपयोग करतांना विभक्ती प्रत्ययाप्रमाणेच इतरही काही प्रत्यय असतात. हे प्रत्यय शब्दयोगी अव्यय म्हणून ओळखले जातात.
उदा. खुर्चीवर, घराकडे, कधीपासून, टेबलखाली
        अधोरेखांकित केलेले शब्द अर्थात वर, कडे, पासून, खाली, हे विशिष्ट शब्दांना जोडून आलेले आहेत. अधोरेखांकित शब्द ज्या शब्दाला लागून आलेले आहेत. त्या शब्दाच्या दुसऱ्या शब्दाशी ते संबंध जोडताना दिसतात.


शब्दयोगी अव्ययाचे प्रकार :-
१. कालवाचक :- आधी, नंतर, आता, पूर्वी, पुढे, पर्यंत, 
२. गतिदर्शक :- पर्यंत, आतून, मधून, खालून, पासून,
३. स्थलवाचक :- मागे, पुढे, आत, बाहेर, जवळ, समोर, अलीकडे, ठायी, पाशी, नजीक, समीप, समक्ष
४. कारणवाचक :- व्दारा, मुले, करवी, करून, कडून, हाती, योगे,
५. हेतुवाचक :- करिता, कारणे, साठी, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त
६. तुलनात्मक :- मध्ये, तर, पेक्षा, परीस, तम
७. विरोधवाचक :- उलटे, वीण, उलट, विरुद्ध

८. क्रियाविशेषण अव्यय

८. क्रियाविशेषण अव्यय :-
* क्रियाविशेषण :- क्रियाचा विशेष दाखविणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. 

वाक्यातील कर्ता , कर्म , क्रियापद यांचे लिंग वचन , पुरुष बदलले असले तरी काही शब्द हे जसेच्या तसेच राहतात. अर्थात त्याचा व्यव होत नाही. अशा शब्दांना अव्यये असे म्हणता येइल. असेच शब्द विशिष्ट क्रियेच्य संदर्भात असून आणि ते कोणत्याही कर्ता , कर्मानुसार बदलत नसेल तर त्याला क्रियाविशेषण अव्यव असे म्हणता येईल.

*प्रकार व पोटप्रकार 
 २ प्रमुख प्रकार :- अ . अर्थावरून व
                        आ . स्वरूपावरून
  
अ . अर्थावरून क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार पुढील प्रमाणे :-
 १. कालवाचक :- आधी, आता, हल्ली, नंतर, मग, सांप्रत, उदया, काळ, सध्या, तूर्त, मागे, परवा, दिवसा, रात्री, पूर्वी इ. 
२. सातत्यदर्शक :- सदा, नित्य, पुन्हा, वारंवार, दरवर्षी, दररोज, क्षणोक्षणी, दिवसेंदिवस, महिनोनमहिने इ.
३. स्थितीदर्शक :- खाली, वर, येते, जेथे, कोठे, मागे, पुढे, तेथे, जिकडे, अलीकडे, तिकडे, पलीकडे, इ.
 ४. गतिदर्शक :- वरून, खालून, तिकडून, इकडून, मागून, दूर इ. 
 ५. प्रकारदर्शक :- फुकट, उगाच, जेवी, तेवी, जसे, हळू, तसे, असे, व्यर्थ, कसे इ.
 ६. अनुकरणदर्शक :- टपटप, गटागट, झटकन, पटकन, पटापट, पटपट इ.
७. निश्चयदर्शक :- खचित, खरोखर इ. 
८. प्रश्नार्थक :- (याल) ना? (जाल) का?  इ.

 आ . स्वरूपावरून क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार पुढील प्रमाणे :-
१. नामसाधित :- दिवसा, व्याक्तिश, रात्री, अर्थात, इ.
२. सर्वनामसाधित :- यावरून, कित्येकदा, त्यामुळे, यामुळे, त्यावरून इ.
३. विशेषणसाधित :- इतक्यात, मोठयाने, एकत्र, एकदा इ.
४. धातुसाधित :- हसताना, हसू, हसत, रडू, रडत, हसून इ. 
५. अव्ययसाधित :- वरून, येथपर्यंत, कोठून, खालून, इकडून इ. 
६. प्रत्ययसाधित :- कालानुसार, शात्र्यियदृष्ट्या, मनपूर्वक इ. 
७. सामासिक :- समोरासमोर, आजन्म, गैरहजर, हरघडी, दररोज, प्रतिदिन, यथाशक्ती, विनहरकत, गैरफायदा इ.