Monday, 9 February 2015

८. क्रियाविशेषण अव्यय

८. क्रियाविशेषण अव्यय :-
* क्रियाविशेषण :- क्रियाचा विशेष दाखविणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. 

वाक्यातील कर्ता , कर्म , क्रियापद यांचे लिंग वचन , पुरुष बदलले असले तरी काही शब्द हे जसेच्या तसेच राहतात. अर्थात त्याचा व्यव होत नाही. अशा शब्दांना अव्यये असे म्हणता येइल. असेच शब्द विशिष्ट क्रियेच्य संदर्भात असून आणि ते कोणत्याही कर्ता , कर्मानुसार बदलत नसेल तर त्याला क्रियाविशेषण अव्यव असे म्हणता येईल.

*प्रकार व पोटप्रकार 
 २ प्रमुख प्रकार :- अ . अर्थावरून व
                        आ . स्वरूपावरून
  
अ . अर्थावरून क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार पुढील प्रमाणे :-
 १. कालवाचक :- आधी, आता, हल्ली, नंतर, मग, सांप्रत, उदया, काळ, सध्या, तूर्त, मागे, परवा, दिवसा, रात्री, पूर्वी इ. 
२. सातत्यदर्शक :- सदा, नित्य, पुन्हा, वारंवार, दरवर्षी, दररोज, क्षणोक्षणी, दिवसेंदिवस, महिनोनमहिने इ.
३. स्थितीदर्शक :- खाली, वर, येते, जेथे, कोठे, मागे, पुढे, तेथे, जिकडे, अलीकडे, तिकडे, पलीकडे, इ.
 ४. गतिदर्शक :- वरून, खालून, तिकडून, इकडून, मागून, दूर इ. 
 ५. प्रकारदर्शक :- फुकट, उगाच, जेवी, तेवी, जसे, हळू, तसे, असे, व्यर्थ, कसे इ.
 ६. अनुकरणदर्शक :- टपटप, गटागट, झटकन, पटकन, पटापट, पटपट इ.
७. निश्चयदर्शक :- खचित, खरोखर इ. 
८. प्रश्नार्थक :- (याल) ना? (जाल) का?  इ.

 आ . स्वरूपावरून क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार पुढील प्रमाणे :-
१. नामसाधित :- दिवसा, व्याक्तिश, रात्री, अर्थात, इ.
२. सर्वनामसाधित :- यावरून, कित्येकदा, त्यामुळे, यामुळे, त्यावरून इ.
३. विशेषणसाधित :- इतक्यात, मोठयाने, एकत्र, एकदा इ.
४. धातुसाधित :- हसताना, हसू, हसत, रडू, रडत, हसून इ. 
५. अव्ययसाधित :- वरून, येथपर्यंत, कोठून, खालून, इकडून इ. 
६. प्रत्ययसाधित :- कालानुसार, शात्र्यियदृष्ट्या, मनपूर्वक इ. 
७. सामासिक :- समोरासमोर, आजन्म, गैरहजर, हरघडी, दररोज, प्रतिदिन, यथाशक्ती, विनहरकत, गैरफायदा इ.

2 comments: