विशेषण:-
पदार्थाचा गुण दर्शविणारा शब्द किवा नामची विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय.
उदा. लाल फूल, तीन पेन , गोड आंबा
प्रमुख ३ प्रकार व त्यांचे पोटप्रकार :-
अ . गुणविशेषण
ब . संख्याविशेषण ----
१ . गणनावाचक संख्याविशेषण
२ . क्रमवाचक संख्याविशेषण
३ . आवृतीवाचक संख्याविशेषण
४. पृथकवाचक संख्याविशेषण
५. अनिश्चितवाचक संख्याविशेषण
क. सार्वनामिक विशेषण
अ . गुणविशेषण-- ज्या विशेषणाने नामचा विशेष गुण दाखविला जातो त्याला गुणविशेषण म्हणतात.
हुशार मुलगा,
लाल फूले,
काळी चप्पल,
ब . संख्याविशेषण -- ज्या विशेषणाने नामची संख्या दाखविली जाते, त्याला सांख्यविशेषण म्हणतात.
त्याचे पोटप्रकार
१ . गणनावाचक संख्याविशेषण :-
ह्या प्रकारात संख्याविशेषणाने वस्तुची गनती किवा मोजणी करतात.
उदा. चार फूल, सहा केळी, शंभर रन इ.
२ . क्रमवाचक संख्याविशेषण :-
ह्या संख्याविशेषणाने वस्तुचा क्रमांकाचा बोध होतो.
उदा. तिसरा नंबर, पाचवा, सहावा इ.
३ . आवृतीवाचक संख्याविशेषण :-
ह्या संख्याविशेषणाने एखादया संख्येची किवा वस्तूची किती वेळा आवृती झाली हे समजते.
उदा. तिप्पट, चौपट, दुहेरी इ.
४. पृथकवाचक संख्याविशेषण :-
ह्या संख्याविशेषणाने वेगवेगळ्या मनांचा पृथक संख्यात्मक बोध होतो.
उदा. तीन तीनचे ग्रुप, एक एक फूल,
५. अनिश्चितवाचक संख्याविशेषण :-
ह्या संख्याविशेषणाच्या माध्यमातून निश्चित संख्याचा बोध होत नाही.
उदा. सर्व मुले, थोड्या मूली, काही फळ इ.
क. सार्वनामिक विशेषण-- सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाना सार्वनामिक विशेषण म्हणतात.
ती गाड़ी, ते फूल, त्याचे पुस्तक, ही मुलगी इ.
★ नामे, धातुसाधिते, अव्यये यांचा विशेषण म्हणून उपयोग होतो. पुढीलप्रमाणे:-
१. नामसाधित विशेषण :- नामाचा उपयोग विशेषणासारखा होतो
तो साडी विक्रेता आहे. (साडी- मुळ नाव, विक्रेता - नामाबद्दल विशेष माहिती)
हि नागपूरची संत्री आहेत. (नागपूर -- हे नामापासून बनलेले विशेषण, संत्री - नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करते.)
२. धातुसाधित विशेषण :-एखाद्या वाक्यामध्ये नामची विशेषणे हि क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली असतात अशा विशेषणाला धातुसाधित विशेषण म्हणतात.
तो धावणारा मुलगा बघा. (धावणारा शब्द मुलगा नामाची विशेषण आहे. त्याचे मुल रूप धाव या क्रियापदाच्या मूळ शब्दापासून तयार झाले आहे.)
ती गाणारी मुलगी पाहा.
३. अव्ययसाधित विशेषण :- वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणे तयार झालेली असतात त्याला अव्ययसाधित विशेषणे म्हणतात.
समोरची खिडकी बंद आहे. (समोर या शब्दाला ची हा प्रत्यय लागला आहे.)
★ विशेषणासंबंधी इतर माहिती
१. नामाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.
विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती देते त्याला विशेष्य असे म्हणतात.
उदा. उंच मुलगा (उंच हे विशेषण व मुलगा हे विशेष्य )
२. जेव्हा विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागल्यासारखा दिसतो तेव्हा ते विशेषण नसून नाम असते.
उदा. हुशार मुलांना गर्व असतो. (हुशार - विशेषण )
हुशारांना फार गर्व असतो. (हुशारांना - नाम )