नाम
व्याख्या :- वास्तविक
किवा काल्पनिक सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा शब्द म्हणजे नाम होय (मो. के. दामले )
उदा. कागद, गाई,
चिकू,
जॉकी,
गंगा,
महाबळेश्वर,
गोदावरी,
राम,
मेहनत,
चतुरपणा,
चपळाई, प्रामाणिक
इ.
नामाचे मुख्य ३ प्रकार
आहे.
१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचक नाम
१)
सामान्यनाम :- ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या
समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किवा प्राण्याचा किवा पदार्थचा बोध होतो, त्या नामाला सामान्य नाम म्हणतात.
उदा. म्हशीला २ शिंगे असतात.
आई प्रेमळ असते.
चिकू गोड असतो
माणसाने माणुसकीने वागावे.
2)
विशेष नाम :- ज्या नामाने विशेष
व्यक्तीचा किवा समूहाचा किवा प्राण्याचा बोध होतो, त्याला विशेष
नाम असे म्हणतात.
उदा. राम घरी जा
आशा अभ्यास कर
भारत देश महान आहे
3) भाववाचक
नाम :- ज्या नामाने प्राणी किवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किवा भावयांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात.
उदा. प्रामाणिकपणा हा माणसाचा गुणधर्म आहे.
खेळामध्ये चपळाईची
आवश्यकता असते.
You helped me a lot today thank you my dear friend🤗😇
ReplyDelete